▪️कुडाळ इंग्लिश मिडीयम संघर्ष समितीचा कुडाळ येथील पत्रकार परिषद संस्थाचालकांना ईशारा..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कराची शिक्षण प्रसारक मंडळ कुर्ला संचलित कुडाळ इंग्लिश मीडियम इमारतीवरील डॉ.अनिल नेरूरकर हे नाव हटवण्यासंदर्भात कुडाळ मधील माजी विद्यार्थी,पालक कुडाळ मधील नागरिक यांनी संस्थाचालक यांना लेखी निवेदन देऊन आज कुडाळ येथील शासकीय विश्रागृहावर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या भावना पत्रकार परिषदेतून वेक्त केल्या.यावेळी ओंकार तेली, धिरज परब, अभय शिरसाट ,राकेश वर्दंम , संदेश पडते,विजय प्रभू, सुनील भोगटे,दादा पडते,राजन नाईक,निलेश शिरसाट, निकू महाडेशोर,अमित राणे,अमेय पेडणेकर ,शैलेश घोगळे,श्री.माळकर उपस्थित होते.
कराची शिक्षण प्रसारक मंडळ कुर्ला मुंबई शाखा कुडाळ संचलित कुडाळ इंग्लिश मीडियम स्कूल ला डॉक्टर अनिल नेरूरकर यांच्या नावाचा बोर्ड इमारतीवर लावण्यात आला आहे.दोन वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनानंतर त्या बोर्डावरील नाव झाकून ठेवण्यात आले होते.परंतु कुडाळ शहरातील ग्रामस्थ व पालक विद्यार्थी यांची मागणी आहे की ,बोर्डावरील डॉक्टर अनिल नेरुरकर यांचे नाव पुढील आठ दिवसात म्हणजे सोमवार, दिनांक 17 एप्रिल 2023 पर्यंत खाली उतरविण्यात यावे.अन्यथा कुडाळ इंग्लिश मीडियम संघर्ष समितीच्या वतीने हे नाव खाली घेण्यात येईल.त्यावेळी होणाऱ्या संघर्षास कराची शिक्षण प्रसारक मंडळ कुर्ला- मुंबई शाखा कुडाळ यांचे संस्थाचालक व पदाधिकारी कारणीभूत होतील. तरी आम्ही दिलेल्या निवेदनाचा गाभीर्याने पूर्ण विचार करून सोमवार, दिनांक 17 एप्रिल 2023 पूर्वी आपण इमारतीवर असलेले डॉक्टर अनिल नेरुरकर यांचे नाव खाली उतरवून होणारा संघर्ष टाळावा असे कुडाळ शहरातील जनतेला सहकार्य करावे,असे आज झालेल्या पत्रकार परिषदेत कुडाळ इंग्लिश मिडीयम संघर्ष समिती, कुडाळ च्या वतीने 17 एप्रिल 2023 या तारखेची मुबा संस्थाचालक देण्यात आली आहे.
