✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी
बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे.ही कारवाई आज सकाळी करण्यात आली.यात १ लाख ८ हजाराच्या दारुसह ४ लाखाची गाडी, असा मिळून तब्बल ५ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (वय ३६) अलाबट्टी असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज सकाळी पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे दत्ता देसाई,होमगार्ड जंगले यांनी केली आहे.
