✍🏼लोकसंवाद /- मालवण.

श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा या संस्थेने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय वाचक स्पर्धेत भीमाशंकर शेतसंदी यांनी प्रथम क्रमांक मिळविला.जेष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या कोणत्याही पुस्तकावर १० ते १५ मिनिटे समीक्षणात्मक बोलणे या विषयावर आयोजित या स्पर्धेत श्रीम. ऋतुजा केळकर यांनी द्वितीय तर तृतीय क्रमांकहउज्वला धानजी यांनी मिळविला. उत्तेजनार्थ श्रीम. श्रद्धा सांबारी यांना गौरविण्यात आले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सौ उर्मिला सांबारी अशोक कांबळी, भिकाजी कदम, दिपाली कावले, ग्रंथपाल विनिता कांबळी, सांस्कृतिक समितीच्या भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे, श्रद्धा महाजनी, गोट्या आचरेकर, कर्मचारी महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण सुरेश गांवकर, फर्नांडिस सर यांनी केले.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधत प्रसाद ठाकूर यांनी आपले वडील कै. दादा ठाकूर यांचे स्मरणार्थ आचरा गावातील राहिवासी विध्यार्थी ज्यांना शालान्त परीक्षेत मराठी विषयात जास्त गुण मिळाले आहेत अशा ५ विदयार्थ्यांना संस्थेचे आजीव सभासदत्व मिळवून दिले. या आजीव सभासदत्व योजनेचे हे पाचवे वर्ष असून या योजने अंतर्गत ठाकूर कुटुंबियांनी आतापर्यंत २५ विध्यार्थ्याना संस्थेचे आजीव सभासदत्व मिळवून दिले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page