पुरस्कार प्राप्त सर्व पत्रकारांचे विशाल परब आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार वितरण समारंभ संपन्न..
✍🏼लोकसंवाद /- बांदा .
“तुम्ही मला केव्हाही हाक मारा विशाल फाऊंडेशन कायम तुमच्या पत्रकारांच्या पाठीशी असेल ” असे उद्दोजक विशाल परब यांनी आज बांदा येथील आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना काढले.मला आज अभिमान वाटतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज शहरातील पत्रकार कमी असले तरी खेड्यातील पत्रकार मात्र जास्त आहेत.लोकसंख्या जरी कमी दिसली तरी आमच्या लोकांमध्ये वेगळं कौशल्य आहे. एक पत्रकार काय करू शकतो त्याची ताकद आम्हाला माहिती आहे, असे प्रतिपादन भाजप युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी आज येथे केले. ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलत होते.यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे श्री परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त पत्रकारांनमध्दे उत्कृष्ठ समाजसेवा पुरस्कार श्री.समील जळवी, शोध पत्रकारिता पुरस्कार श्री.विष्णू चव्हाण ,ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संजय भाईप,उत्कृष्ठ महिला पत्रकार पुरस्कार संजना हळदिवे,जीवन गौरव पुरस्कार कृष्णा सावंत, ज्येष्ठ पत्रकार रणजित गावडे स्मृती पुरस्कार श्री मिलिंद धुरी ,आदर्श पत्रकार पुस्कार श्री गोविंद शिरसाट,उत्कृष्ठ शहरी पत्रकार पुरस्कार श्री.शिरीष नाईक , ग्रामीण पत्रकार पुरस्कार आनंद कांडरकर ,उत्कृष्ठ छायाचित्रकार पुरस्कार विष्णू धावडे ,ज्येष्ठ पत्रकार विजय राऊत स्मृती पुरस्कार अभिजित पणदुरकर असे सर्व पुरस्कार प्राप्त सर्वपत्रकार शाल ,नारळ, पुष्पगुच्छ ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सर्वांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी विशाल परब बोलताना पुढे म्हणाले की, मी कुठलाही आमदार, खासदार नाही. मी सर्वसामान्य घरातील व्यक्ती. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून समाजात जिथे जिथे अडचण येते तिथे माझं नाव घेतले जात. हाच माझा अभिमान आहे. कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही व्यासपीठावर जाण्याची माझी ताकद आहे. शत्रुत्व कमी ठेवून मित्रत्व जास्त ठेवण्याचा हा माझा स्वभाव आहे, असे विशाल परब बोलताना म्हणाले.
विशाल परब पुढे बोलताना म्हणाले की आबा खवणेकर हे जिल्ह्यात 100 रुपयाचं पेट्रोल घालून ते जिल्हाभर फिरायचे. परंतु आज त्यांनी एक एक असे करून शंभर व्यक्तीची संघटना तयार केल्याने त्यांच्या कार्याला मी सलाम देतो असेही विशाल परब बोलताना म्हणाले. दरम्यान यापुढेही विशाल सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मराठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक मीडियाला जे जे सहकार्य लागेल ते आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र मराठी पत्रकार संघटनेचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे साहेब , मुंबई संपर्क प्रमुख बाजीराव फराटे , गावडे काका महाराज ,अर्चना घारे परब , बांदा सरपंच प्रियांका नाईक , सेवानिवृत्त कॅप्टन शंकर भाईप,अपर्णा कोठावळे ,पुंडलिक दळवी ,श्वेता शिरोडकर , जिल्हा अध्यक्ष आबा खवणेकर , जिल्हा उपाध्यक्ष समील जळवी,जिल्हा सचिव शिरीष नाईक ,जिल्हा खजिनदार संजना हळदिवे,जिल्हा सह खजिनदार संजय भाईप, जिल्हा सह सचिव कृष्णा सावंत ,जिल्हा सदस्य मिलिंद धुरी,जिल्हा सदस्य आनंद कांडरकर , जिल्हा सदस्य प्रसन्ना गोंदावले , लवू परब ,गोविंद शिरसाट अन्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
