✍🏼 लोकसंवाद /- वैभववाडी.
ग्रुप ग्रामपंचायत एडगाव- वायंबोशी उपसरपंचपदी भाजपाच्या सायली सुनिल घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच दत्ताराम पाष्टे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी सायली घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, सरपंच रविना तांबे ,रवळनाथ विकास सोसा. चे चेअरमन, सुनिल रावराणे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष राजु पवार, विनोद रावराणे, रविंद्र रावराणे, दत्ताराम पाष्टे, प्रज्ञा रावराणे, वैष्णवी रावराणे, चेतना पवार, रविंद्र तांबे, गोविंद घाडी, सुनिल घाडी, बयाजी गुरखे, सखाराम फाळके, योगेश पवार, निवडणुक अधिकारी उमेश राठोड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
