✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
सुशांत खिल्लारे याचा खून केल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिसाच्या ताब्यात असलेल्या तुषार पवार याला आज जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर अन्य पाच जणांना १६ तारखे पर्यत पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी ही कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
