✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे यजमान पद स्वीकारलेल्या वेंगुर्ले येथे आयोजित भंडारी चषकाच्या तारखेत बदल करण्यात आला असून दि.14 व 15 फेब्रुवारी ला अचानक मा. मुख्यमंत्री यांचा दौरा वेंगुर्ले येथे लागल्याने व त्यांचे विमानाचे हेलीपॅड वेंगुर्लेचे क्रीडांगणावर प्रशासनाने निश्चित केल्यामुळे क्रीडांगण त्या तारखांना मिळू शकत नाही. त्यामुळे जिल्हा महासंघाचे अध्यक्ष यांनी यजमान भंडारी ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्री. ऍड. गोडकर व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर सामने दि. 21 व 22 फेब्रुवारी ला त्याच क्रीडांगणावर घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तरी सर्व तालुक्यांनी वरील तारखेला आपले संघ समिती प्रमुखांना संपर्क करून पाठवावेत, असे आवाहन यजमान, वेंगुर्ले भंडारी ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष ऍड. शाम गोडकर व महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांनी केले आहे.
