लोकसंवाद /- मालवण.

कांदळवन वृक्षांबाबत सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांना माहिती व्हावी, त्याचे महत्त्व समजावे, जेणेकरून कांदळवनाच्या संवर्धन, संरक्षणास सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळावा.यासाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे शिक्षकांनी आचरा खाडीतील जामडुल युवक ‘ओमप्रकाश आचरेकर यांना सोबत घेऊन कांदळवन ची माहिती जाणून घेतली व तेथे रोपांची लागवड केली

त्याचबरोबर यांचा प्रसार होण्यासाठी एक छोटीशी नाटिका बसवण्याची संकल्पना मुख्याध्यापक संजय नाईक यांनी शिक्षकांच्या समोर मांडली. आणि लागलीच सर्व सहकारी शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वरील संकल्पना प्रकाश कानूरकर (सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ) यांनी जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांना सांगितली. सर्वांनी या कांदळवनाचा प्रसार करावा अशी विनंती केली. याला प्रतिसाद म्हणून सर्व जिल्ह्यांतील शिक्षकांनी कांदळवन सफर करण्याची इच्छा व्यक्त केली.

कांदळवन हे आचरा बंदराजळच्या खाडीत आहे. हे कांदळवन म्हणजे सागराजवळ वाढणारा अनेक वनस्पतींचा समूह. याला मराठीत कच्छ वनस्पती असेही म्हणतात. या कांदळवनामुळे समुद्री अन्नसाखळी टिकून राहते. हे इतके उपयुक्त आहे, कांदळवने समुद्र किनाऱयांचे लाटांपासून, त्सुनामीपासून तसेच नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करतात. अनेक समुद्र प्रजातींचे प्रजनन कांदळवन क्षेत्रात होते., यासाठी ‘पांढरी चिप्पी’ (सोनेरेशिया अल्बा) या वृक्षास राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषीत करण्यात आले आहे.” राज्य कांदळवन वृक्ष” घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page