✍🏼लोकसंवाद /- ओरोस.

शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी तसेच जिल्ह्यात श्वेतक्रांती घडविण्याच्या उद्देशाने आज जिल्हा बँक, जिल्हा परिषद, भगिरथ प्रतिष्ठान आणि गोकुळ दुध संघ या चौघांनी एकत्र येवून करार केला आहे. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. अशा प्रकारे प्रशासन, सहकारी बँक आणि सहकारी संस्था एकत्र येवून काम करण्याचा राज्यातील हा पहीलाच प्रयोग आहे, असा दावा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केला. आज या ठीकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहीती देण्यात आली. तत्पुर्वी हा करार करण्यात आल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले.

जिल्हा बँक प्रधान कार्यालयात पार पडलेल्या करार कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रभारी कृषी अधिकारी विनायक ठाकूर, प्रभारी जिल्हा पशू संवर्धन अधिकारी डॉ विद्यानंद देसाई, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक प्रकाश मोर्ये, विठ्ठल देसाई, निता राणे, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, विद्याधर परब, गजानन गावडे, प्रज्ञा ढवण, बँक कर्मचारी मंदार चव्हाण आदी उपस्थित होते. बँक अध्यक्ष दळवी यांनी प्रशासक नायर यांचे स्वागत केले. डॉ देवधर व प्रमोद गावडे यांनी सामंजस्य करार बाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page