✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
सावंतवाडी व दोडामार्गमध्ये ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर सावंतवाडी येथील “एस. एम. मडकईकर ज्वेलर्स” कडून “एक ग्रॅम” च्या दागिन्याचे शोरूम कुडाळ मध्ये सुरू केले जात आहे. ४ तारखेला या दालनाचे उद्घाटन होणार आहे. या निमित्ताने ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत ग्राहकांना विशेष ऑफर देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत- जास्त ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा उद्योजक विराग मडकईकर यांनी केले आहे. तर नव्याने सुरू करण्यात येणारे दालन कुडाळ पान बाजार येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या जागेत सुरू केले जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याबाबत माहिती देताना श्री. मडकईकर म्हणाले, विशेष म्हणजे कुडाळ शहरात प्रथमच १ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा शोरूम सुरू होत आहे. त्याचे उद्घाटन ४ फेब्रुवारीला होणार असून याच पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी खास ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. यात ३ हजारांच ‘मंगळसूत्र’ फक्त २२०० रूपयांत, ३ हजारांचा राणी हार २२०० रूपयांत, ‘नेकलेस सेट’ फक्त १८०० रूपयात, ३ हजाराचा काकणांचा सेट २००० रुपयात, ४ हजाराचे पाच पदरी मंगळसूत्र ३२०० रूपयात उपलब्ध होणार आहे. तसेच ठराविक वस्तूंच्या खरेदीवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मूर्तीचा “सिल्वर शो पीस” मोफत दिला जाणार आहे. ही ऑफर ४ ते २० फेब्रुवारी पर्यंत मर्यादित असून जास्तीत जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी कुडाळ पान बाजार येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या दालनात भेट द्यावी, किंवा विराग मडकईकर 8411930437, वैष्णवी मडकईकर 7796695448 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.