तार, झोपडीचे पत्रे ,अँगल चोरून नेल्याचा संशय पोलीस चौकशी सुरू..
लोकसंवाद /- ओरोस.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या शासकीय मालकीच्या जैवविविधता वन उद्यानाची कुंपणाची तार, झोपडीचे पत्रे व अँगल चोरून नेल्या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी स्थानिक चार युवकांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा पर्यंत याबाबत पुढील कार्यवाही सुरू होती.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या शासकीय मालकीच्या जैवविविधता वन उद्यानाची कुंपणाची तार, झोपडीचे पत्रे व अँगल २६ डिसेंबर सायंकाळी ५.३० ते २७ डिसेंबर सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान चोरून नेण्यात आले होते. या प्रकरणी वन विभागाचे अधिसंख्य वन मजूर संतोष घाडीगावकर यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात भादवी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जैवविविधता वन उद्यानाच्या सभोवती तारेचे कुंपण आहे. तसेच कर्मचारी यांना विसावा घेण्यासाठी पत्रे असलेली झोपडी आहे. अज्ञात चोरट्याने कुंपणाची २० मीटर तार चोरली होती. तसेच झोपडीचे पत्रे चोरून नेले होते. पत्रे लावण्यासाठी वापरण्यात आलेले लोखंडी अँगल गॅस कटरने कापून त्याचीही चोरी केली होती. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस कसून तपास करीत होते. तपासा अंती पोलिसांना ओरोस येथील चार युवकांवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. या युवकांकडून कसून तपास सुरू आहे.