लोकसंवाद /- परुळे.

परुळे येथे राधारंग फाउंडेशन पुरस्कृत आणि परुळे युवक कला क्रीडा मंडळ आयोजित सवेश नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ९ जानेवारी २०२३ रोजी रात्री ठीक ८ वाजता श्री देव आदिनारायण मंदिराच्या रंगमंचावर होणार आहे. या स्पर्धेत १५ वर्षे वयावरील सर्व स्त्री-पुरुष सहभागी होऊ शकतात. स्पर्धेतील प्रथम चार विजेत्यांना अनुक्रमे रु.२५००,२०००,१५०० आणि १०००/- तसेच सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी डाॕ.प्रशांत सामंत (९४२३३१८२३१) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page