लोकसंवाद /- कुडाळ.

दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण येथे पार पडल्या. या स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात सावंतवाडी संघावर मात करून विजेतेपद मिळवले. या संघाची निवड सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. कर्णधार कुमारी भार्गवी प्रदीप पाटकर हिच्या नेतृत्वाखालील संघाने अतिशय चांगला खेळ केला.कुमारी वेदश्री श्रीपाद ठाकूर, मनस्वी अमोल केरकर, वैष्णवी यशवंत परब, प्रणाली रवींद्र ठूंबरे,याशिका रुपेश बेळगावकर, भूमिका भरत परब,वेदांगी उमेश घारे, युक्ती संतोष हळदणकर,निधी गिरीधर केळूसकर, लावण्या अर्जुन मेस्त्री हे खेळाडू सहभागी होते.

विजयी संघाला क्रीडाशिक्षक श्री. राजन हंजनकर,श्री. संजय पवार,श्री.कुबल डी.ए, श्री.दाजी रेडकर, श्री.राजेश गोवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे अभिनंदन संस्था उपाध्यक्ष श्री.दिगंबर सांमत, कार्याध्यक्ष श्री.समाधान परब, सचिव श्री. सुधीर ठाकूर तसेच सर्व संस्था कार्यकारीणी सदस्य यांनी केले. विजयी संघाचे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page