कणकवली /-
कणकवली गडनदी पात्रात येथील कणकवली ते वागदे असलेल्या केटी बादापर्यत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.अखेर त्या मृतदेहाची ओळख पटलेली असून तो ,कणकवली गड नदीपात्रात आढळलेला तो मृतदेह रविदास तुकाराम चौकेकर (वय ५०, सध्या कणकवली बिजलीनगर, मूळ ओसरगाव) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रविदास चौकेकर हे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सफाईगार या पदावर कार्यरत होते.रविदास चौकेकर हे सफाईगार असले तरी मृतदेहांचे पोस्टमार्टम करताना त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असायची. त्यांनी २०१६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू नेमका कसा झाला ? याबाबत अधिक माहिती पोलीस घेत आहेत.
त्यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस चंद्रकांत माने, मंगेश बावदने यांनी.देखील मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले.
