भारतीय जनता पक्ष आणि विशाल परब मिञमंडळाचे जिल्हाखुली शरिरसौष्टव स्पर्धेचे आयोजन..

वेंगुर्ला /

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशाल महोत्सवात वेंगुर्ले येथे बुधवार दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मधूसुदन कालेलकर सभागृह येथे विशाल श्री ही सिंधुदुर्ग जिल्हा खुली शरिरसौष्टव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे यावेळी मिस्टर rld, मि. आशिया, मि. इंडीया, व महाराष्ट्र श्री campiyan पूणे येथील महेंद्र चव्हाण, यांचा बॉडी बिल्डिंग शो, तसेच मि World, मि. आशिया,टॉपफायनालिस्ट, मि. अॅॉलिफिक अमिचल मंगेश गावडे मुंबई या दोन सेलिब्रिटींजचा बॉडी बिल्डिंग शो होणार आहे.ही जिल्हास्तरीय स्पर्धा खुली असल्याने व कोणत्याही असोसिएशनशी निगडीत नसल्याने जिल्यातील 150 स्पर्धेक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

ही स्पर्धा 55,55 ते 60, 60 ते 65, 65 ते 70, 70 ते 75, व 75 किलो वरील अशा वजनी गटात होणार आहे. या स्पर्धेसाठी 3000, 2500, 2000, 1500, व 1000, अशी बक्षिसे प्रत्येक गटांसाठी असणार आहेत. तसेच मेन फिजीकसाठी 3500, 3000, 2500, 2000, 1500 व 1000 अशी सहा बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच बेस्ट पोझर 2500, मोस्ट इंप्रो 2500, व बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप साठी 10000 चे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व मेडल देण्यात येणार आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी गोवा पार्से येथील मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर, तसेच भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, युवा नेते विशाल परब व जिल्ह्यातील भाजपाचे मान्यवर, पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.यावेळी जास्तीत जास्त स्पर्धकांनी व बॉडी बिल्डिंग शो पहाण्यासाठी युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विशाल परब मित्रमंडळाचे प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, बाबली वायंगणकर, व दादा साईल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page