मुंबई/-
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना नवसंजीवनी देण्याकरीता निष्ठा यात्रेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राज्यव्यापी दौऱ्याला मुंबई येथून सुरुवात झाली आहे. काल गुरुवारी चांदीवली विधानसभा मतदार संघामध्ये ही निष्ठा यात्रा पार पडली.दरम्यान आयोजित केलेल्या सभेकरिता कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली होती. राज्यामध्ये सुरू असलेल्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला प्रत्येक ठिकाणी शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.यावेळी माजी परिवहन मंत्री अनिल परब, विधानपरिषद आमदार सचिन अहिर आदीसह शिवसेना नेते,पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
