कुडाळ /-
शुक्रवार दिनांक 22 जुलै रोजी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रो. एकनाथ पिंगुळकर यांचे वडिल श्री.परशुराम अनंत पिंगुळकर निवृत्त प्राथमिक शिक्षक यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त
जीवनावश्यक वस्तूंची शाळेला भेट देण्यात आली. तसेच रो. विक्रांत भोगटे यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष रो. अमित वळंजू , सचिव रो. दिनेश आजगावकर, असिस्टंट गव्हर्नर रो. नीता गोवेकर,रो. प्रमोद भोगटे, रो. एकनाथ पिंगुळकर, रो अभिषेक माने, रो. अजिंक्य जामसंडेकर व संस्थेचे संचालक, कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
