कुडाळ /-

शहरात वाढलेल्या खड्ड्याबाबत आज दुपारी कुडाळ शहर भाजपाच्या माध्यमातून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी आपण याबाबत लवकरच खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेऊ, असे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनात भाजपचे युवा नेते आनंद शिरवलकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, भाजप शहर अध्यक्ष राकेश कांदे, शक्ती केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक निलेश परब, नगरसेवक गणेश भोगटे, नगरसेवक राजीव कुडाळकर ,नगरसेविका चांदणी कांबळी, बंड्या सावंत, राजा पडते, प्रज्ञा राणे , रेवती राणे आदी सहभागी सामील झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page