सावंतवाडी /-
खासदार केंद्र|तील मंत्री नारायण राणेंशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नव्हता ,त्यांनी मातोश्रीवर बोलणे टाळावे त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही.विकासाच्या मुद्दयावर नारायण रणेनशी मी एकमत करायला मी कधीही तयार आहे,अशी भूमिका आज येथे आयोजित पत्रकार परिषद आमदार दीपक केसरकर यांनी मांडली.दरम्यान उद्धव ठाकरे भविष्यात शिंदे गटाशी जुळवून घेतील, असे आम्हाला आजही वाटते.वडीलकीच्या भूमीकेत त्यांनी तसा निर्णय घ्यावा,असा शिवसैनिकांचा आग्रह आहे.त्यामुळे हा वाद कायम राहणार नाही,असेही सुतोवाच त्यांनी केले.श्री.केसरकर यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली,त्यावेळी ते बोलत होते.
