सिंधुदुर्गनगरी /-

प्रादेशिक हवामान विभाग, कुलाबा, मुंबई यांच्याकडून दि. 8 जुलै ते 12 जुलै 2022 या कालावधीत 65 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच 5.3 ते 4.2 मीटर उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्यावर उसळण्याची शक्यता आहे. तरी समुद्र किनारी व खाडी किनारी राहणाऱ्या सर्व मच्छिमार व नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये व मासेमारी बंदी कालावधीचे काटेकोर पालन करावे. कोणतीही चीवित व वित्तहानी होणार नाही याबाबत दक्षाता घेण्याचे आवाहन चि.सं.जोशी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी, परवाना विभाग, वेंगुर्ला यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page