मालवण /-
मालवण शहरात कोसळलेल्या पहिल्याच मुसळधार पावसात शहर जलमय झाल्याने नागरिकांनी मालवण नगरपालिकेच्या गटार खोदाई कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर नागरिकांना झालेल्या त्रासाची दखल मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी घेत आज मालवण दौऱ्यावर आलेल्या आम. नाईक यांनी शहरात गटार खोदाईचे काम घेतलेल्या नाशिकच्या ठेकेदाराला जाब विचारत खडे बोल सुनावले. यावेळी आमदार नाईक यांच्या रोषाला मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनाही सामोरे जावे लागले. यावेळी नगरपालिका प्रशासनाकडून संबंधित ठेकेदाराला पाच लाख रुपयाहुन अधिक रक्कम बिलापोटी देण्यात आल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदारांच्या निदर्शनास आणताच ठेकेदाराने गटार खोदाई समाधानकारक न केल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे आणि त्याच्यावर फौजदारी कारवाई करावी असे सूचनावजा आदेश आमदारांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.
