दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुका शिवसेना तालुकाप्रमुख पदावरून अखेर दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक गणेशप्रसाद गवस यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्याजागी शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या संजय गवस यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या सुचनेनुसार दोडामार्ग शिवसेना प्रभारी तालुका प्रमुखपदी संजय गवस यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी जाहीर करत तसे निवडीचे पत्र संजय गवस यांना पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page