मुंबई/-
एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव बहुमताने मंजूर झाला असून तसे राज्यपालांनी आदेश दिल्यानंतर आज शिंदे गटाने आज विधानभवनात बहुमत सिद्ध केले.तर विरोधी पक्षाच्या बाजूने ९७ मते मिळाली.बाजूने – १६४ विरोधात – ९९
,सपा तटस्थ तर तटस्थ एम आय एम ०२ , राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य अशोक चव्हाण आज सभागृहात अनुपस्थित राहिले.विश्वासदर्शक ठरावावर सत्ताधारी गटाकडे १६४ मते ,संतोष बांगर नव्याने शिंदे गटात सहभागी झाले.परंतु, विधान सभा अध्यक्ष यांना मतदानाचा अधिकार नसल्याने १६४ ही संख्या कायम राहिली.
या विश्वासदर्शक ठरावात शिंदे गटाने शिवसेनेला धक्का देत बहुमताचा ठराव १६४ जिंकत बहुमत सिद्ध केले आहे कालची विधानसभा अध्यक्ष पदाची पहिली परीक्षा पास झाल्यानंतर आज दुसऱ्या परिषदेही शिंदे फडणवीस सरकारने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे यामुळे या सरकारच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
