मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीमध्ये दाखल झाल्यानंतर
शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सामंत यांचे स्वागत करत घेतली “गळाभेट”
मुंबई /-
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला दिवसेंदिवस धक्के बसत आहेत. आज सकाळपासून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर आता ते गुवाहाटीला पोहचले आहेत.तर शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची गळाभेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी देखील सामंत यांचे स्वागत केले.
बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत सध्या ९ मंत्री आहेत. तर आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे एकमेव विधानसभेत निवडून आलेले मंत्री उरले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील आमदार आणि मंत्र्यांना थांबवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अपयश येताना दिसत आहे.