सावंतवाडी /-
महाराष्ट्र शासन कृषि विभाग सावंतवाडी यांच्या मार्फत कलंबिस्त येथे कृषि संजीवनी सप्ताह कलंबिस्त उपसरपंच नामदेव पास्ते माजी सरपंच अनंत सावंत, शेतकरी महिला वर्ग यांच्या उपस्थितीत पार पडला.
शेतकऱ्याना शेतीचे महत्त्व प्रात्यक्षिकद्वारे पटवून शेती उत्पादन वाढीसाठी सातत्याने कृषि विभाग मार्गदर्शन करीत आहे.कृषि संजिवनी सप्ताहाच्या निमित्ताने भात पिकावरील किड व रोग या विषयी सखोल मार्गदर्शन मंडळ कृषि अधिकारी एस. बी. देसाई यानी केले.तर भात पिकाची गादी वाफ्यावर पेरणी तसेच एस. आर. आय. ,यांत्रीकीरण पध्दतीने लागवड करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा या विषयी सविस्तर मार्गदर्शन कृषीपर्यवेक्षक वाय.ए.गवाणे यानी केले.
कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी माहीती व मार्गदर्शन ओटवणे कृषीसहायक्क स्वप्निल शिर्के यानी केले .तर म.ग्रा रो.ह.यो.अंतर्गत फळबाग लागवडीसाठी आव्हान कृषिसहाय्यक सी.एल.राऊळ यानी केले.तसेच बांधा वर लागवड करण्यासाठी तूरडाळ बियाणांचे वाटप महिला शेतकरी गटाना करण्यात आले
यावेळी एस.आर.आय.पध्दतीने भात लागवड प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी सांगेली कृषिसहाय्यक अनमोल गावडे,शिरशिंगे कृषिसहाय्यक अक्षय खराडे,चौकुळ कृषिसहाय्यक सावता घेरडे,पारपोली कृषिसहाय्यक साखरे तसेच दशरथ पास्ते,सह्याद्री महिला गट अध्यक्ष कविता देसाई, अन्नपुर्णा महिला गट रश्मी गवस,माउली महिला गट अध्यक्ष माधवी कलंबिस्कर ,इ.उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक वाय.ए.गवाणे तर स्वागत व आभार सी.एल.राऊळ यानी मानले.