कुडाळ /-

आज 17 जून 2022 रोजी युवा फोरम च्या सदस्यांनी इतर सामाजिक कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला भेट देऊन आपल्या मागण्या पत्राद्वारे सुपूर्द केल्या. रस्त्यावरील तुंबणारे पाणी व त्यानुळे होणारे अपघात ह्यावर त्वरीत योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कधीही कार्यरत नसलेले पथदिवे तातडीने दुरुस्त करावेत. युवा फोरम ने अधिकाऱ्यांना ३० जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, तोपर्यंत या समस्या न सुटल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन पुकारण्यात येईल.
यावेळी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख शुभम सिंदगीकर, कुडाळ तालुका प्रमुख सौरभ शिरसाट, रोहन करमळकर, सामाजिक कार्यकर्ते मनोज वालावलकर, सर्वेश पावसकर, रोहित अटक, स्वरूप वाळके आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page