ओरोस /-
पॉस्को अंतर्गत केलेल्या तक्रारीत शिक्षकाची 25 (पंचवीस) हजारच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे या संदर्भातील केस मद्धे ,ऍड.विवेक उर्फ बंड्या माडकुलकर यांनी काम पाहिले.सविस्तर माहिती अशी की,यातील नमूद फिर्यादी यांची जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, अणसुर खालचे, ता. वेंगुर्ला येथे शिकत असलेली पिडीत अल्पवयीन मुलगी हिला शाळेतील कार्यानुभव या विषयाचे तोरणे बनवून ती दरवाजाला लावण्यास सांगितली.त्यातील एक तोरण हे बेंचवर चढून दरवाजाला लावत असताना तेथे यातील आरोपी शिक्षक यांनी पिडीत अल्पवयीन मुलीच्या पाठीमागून येऊन तिच्या उजव्या बाजूच्या छातीला हात लावला व मजा वाटते का? असे विचारून लगेचच दुसन्या बाजूला सुद्धा दाबले अशा मजकूराची दिले फिर्यादीवरून नमूद प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर आरोपी याची अटक पूर्व वैद्यकीय तपासणी करून मा.सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करुन त्याचे अटकेची समज ही त्याची पत्नी यांना समक्ष देण्यात आलेली आहे.आणि त्यांची (२५,००० )पंचविस हजारच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.या केस संदर्भातील ओरोस येथील जिल्हा न्यायालयात युक्तीवाद ऍड .विवेक उर्फ बंड्या माडकुलकर यांनी पाहिले.
