कणकवली /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या वैश्य गुरु श्री श्री वामनाश्रम महास्वामींच्या 19 व्या चातुर्मास सोहळ्याची मुख्य जबाबदारी कणकवली तालुक्यावर आहे. चातुर्मासाचे नियोजन कसे सुव्यवस्थित असावे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच निमंत्रण इत्यादी कामाची जबाबदारी चे वाटप – नियोजन करण्यासाठी सोमवार दिनांक 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता वाळकेश्वर मंगल कार्यालय येथे कणकवली तालुक्यातील वैश्य बंधू भगिनींची सभा आयोजित केली आहे.या सभेस सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष, वैश्य समाज कणकवली चे सीताराम उर्फ दादा कुडतरकर, व कार्यकारिणी वैश्य समाज कणकवली तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page