कुडाळ /-
परिवर्तन बहुउद्देश्यीय सेवाभावी संस्था,(इचलकरंजी) अखिल दशवतारी पारंपरिक लोककला अकादमी (सिंधूदुर्ग) आणि एशिया बुक रेकॉर्ड पब्लिकेशन यांच्या सयुक्त विद्यमाने कोल्हापुर येथे काल (ता.१५)ला आयोजित करण्यात आलेल्या महाराणी तराराणी भोसले सामाजिक विचार संमेलनात सिंधुदुर्गतिल वैशाली महादेव प्रभुखनोलकर (झाराप तालुका कुडाळ)यांना पत्रकार क्षेत्रात उलेखनीय काम केल्याबद्दल ,महाराष्ट्र उत्कृष्ट समाज पत्रकारिता पुरस्कार, जेष्ठ अभिनेते आंनद काळे यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले आहे. वैशाली खानोलकर यांचे कृषि, सामाजिक, ओद्योगिक, राजकीय,पत्रकार क्षेत्रातुन।अभिनंदन होत आहे. या आधी ही त्याना शासनाच्या विविध पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे.
