ब्युरो न्यूज /-
पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले असताना आता पुन्हा cng गॅस वाढून ,सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये देखील वाढ झाली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे शहारात सीएनजी आणि पीएनजीच्या दरांचा भडका उडाला आहे.
महानगर गॅस लिमिटेडने पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. सीएनजीच्या दरांत प्रति किलो 5 रुपये आणि पीएनजीच्या दरांत 4.50 रुपये वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर मंगळवार मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.
आठवडाभरात झालेली ही दुसरी दरवाढ आहे. दरानुसार मुंबईत सीएनजी 72 रुपये प्रति किलो आणि पाईप्ड कुकिंग गॅस 45.50 रुपये प्रति किलो झाला आहे. तर पुण्यात सीएनजीचे दर 68 रुपये प्रति किलोवरून 73 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. राज्य सरकारने व्हॅट कमी केल्यामुळे । एप्रिलपासून सीएनजीचे दर 6 रुपयांनी कमी झाले होते.
पण केंद्र सरकारने नैसर्गिक वायूचे दर 110 टक्क्यांनी वाढवल्यामुळे मुंबईत सीएनजी 7 रुपयांनी वाढून 67 प्रति किलो तर पीएनजी 5 रुपयांनी वाढून 41 रुपये प्रति किलोवर गेले होते. पण आता महानगर गॅस लिमिटेडने पुन्हा दर वाढवल्याने सामान्य मुंबईकरांना मिळालेला काहीसा दिलासा आता नाहीसा झाला आहे. ग्राहक केंद्रित कंपनी असल्याने आम्ही 8 लाखांहून अधिक सीएनजी आणि 18 लाखांहून अधिक घरगुती पाईप्ड गॅस ग्राहकांसाठी किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु गॅसच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ असल्याने आम्ही दरवाढ करण्याचा निर्णय घेत असे लिमिडेटच्या निवेदनात नमूद केले आहे.
