गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना बीएसएनएलची सेवा मिळत नव्हती, बीएसएनएलची नेटवर्क सेवा, फोन बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फॉर्म होम असल्यानं अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील लोकांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विजय कदम यांच लक्ष वेधल. दरम्यान, याबाबत वारंवार तक्रार करून दखल न घेतल्याने कदम यांनी आक्रमक होत याचा संबधित अधिकाऱ्याला जाब विचाराला. या अधिकाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तर दिली गेल्यानं राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाला धडक दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत जाब विचारला. दरम्यान, बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून संबधित अधिकाऱ्याला समज देण्यात आली. तर आजच्या आज ठप्प असलेली सेवा पूर्ववत केली जाईल अस आश्वासन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिल. तर या घटनेबाबत तसेच कोव्हीड काळात यंत्रणेवर आलेला ताण, तसेच ग्राहकांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून निदर्शनास आणून देत जनतेला न्याय मिळवून देऊ अस मत राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केल. यावेळी न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, उद्योग व व्यापारचे कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, नवल साटेलकर, पद्मराज मुणगेकर, आर्यन रेडीज आदि उपस्थित होते.