मालवण /-
नौकेतून ट्रॉलरच्या दिशेने जात असताना मालवणच्या समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या खंडाळ वारस रत्नागिरी येथील गणेश प्रकाश बाचरे (३६ ) याचा मृतदेह आज सकाळी मालवण मच्छि मार्केटसमोरील समुद्रात तरंगताना आढळून आला आहे पोलिसांनी त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळ वारस रत्नागिरी येथील गणेश प्रकाश बाचरे हा खलाशी समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती . याप्रकरणी विनोद पाते याने गणेश बाचरे बेपत्ता झाल्याची खबर मालवण पोलीस स्थानकात देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री गणेश प्रकाश बाचरे व विनोद शंकर पाते हे दोघे खलाशी नौकेतून अनंत मालवणकर यांच्या ऋषीकेश ट्रॉलरवर पाण्याच्या बाटल्या व रेशनिंग घेऊन जात होते. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास समुद्रात मोठी लाट आली व गणेश बाचरे व विनोद पाते हे दोघे नौकेतून समुद्रात फेकले गेले. यामधील विनोद पाते या खलाशाने पोहत नौका गाठली. परंतु गणेश बाचरे हा खलाशी समुद्रात बेपत्ता झाला होता.आज गणेश प्रकाश बाचरे याचा मृतदेह मालवणच्या समुद्रात आढळून आला याबाबत दत्ताराम भिकाजी बाचरे यांनी मालवण पोलिसात खबर दिल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले याबाबत पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री भारत फारणे,पोलीस नाईक विलास टेंबुलकर हे अधिक तपास करीत आहेत.
