You are currently viewing नगराध्यक्ष पद आरक्षण सोडत 27 जानेवारी रोजी..

नगराध्यक्ष पद आरक्षण सोडत 27 जानेवारी रोजी..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची सोडत गुरुवार २७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. मुंबई मंत्रालय येथे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. महाराष्ट्रातील १३९ नगरपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकांच्या निकालानंतर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण काय पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महिन्याभरात आरक्षण सोडत होऊन नगराध्यक्ष विराजमान करणे आवश्यक आहे. दरम्यान या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांच्या आरक्षणाची सोडत नगर विकास विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. ही आरक्षणाची सोडत गुरुवार २७ जानेवारी रोजी सायं. ४ वा. मुंबई मंत्रालय प्रधान सचिव यांच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, वैभववाडी, देवगड या ४ नगरपंचायतींचे आरक्षणही जाहीर होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा