You are currently viewing सेवानिवृत्त शिक्षकाना नाममात्र सभासद करुन घेणार!सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी कडून घोषणा

सेवानिवृत्त शिक्षकाना नाममात्र सभासद करुन घेणार!सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी कडून घोषणा

मसुरे /-

झुंजार पेडणेकर महाराष्ट्र शासन राजपत्र २६ डिसेंबर २०२१ या शासननिर्णयानुसार निवृत्त होणाऱ्या सदस्यांना ठेवी परत केल्यामुळे झालेल्या रोखतेच्या टंचाईवर मात करण्यासाठी निवृत्त झालेल्या सदस्यांना नाममात्र सदस्य करून त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडून ठेवी घेण्यासाठी वेतनदार सहकारी पतसंस्थेला अनुमती देण्यासाठी कलम १४४-५ अ ( सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम १४४ -५ अ ) मध्ये सुधारणा करण्यात आलेली असून वेतनदार सहकारी पतसंस्थेला त्यांच्या सदस्यांना सेवानिवृतीनंतर नाममात्र सभासद म्हणून नाव नोंदवून त्यांच्या कडून स्वेच्छेने ठेवी स्विकारता येतील.या अनुषंगाने संचालक मंडळाने साकल्याने विचार करुन संबंधित सेवानिवृत्त बंधू-भगिनींना सभासद करुन घेण्याचे ठरविले असून यापुढे त्यांना संस्थेचे 'ब' वर्ग सभासद करून घेण्यात येईल.याची प्रत्यक्ष कार्यवाही सोमवार दि.२४/०१/२०२२ पासून करण्यात येणार आहे.तरी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या.सिंधुदुर्गनगरीचे सभासद व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

आपल्याला सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक पुंजींची गुंतवणुक निश्चिंतपणे या संस्थेमध्ये करून इतर संस्था किंवा बँकांपेक्षा अधिक व्याजाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा, जेणेकरुन आपला व्याजस्वरूपात फायदा होईल व संस्थेच्या एकूण आर्थिक स्थितीला मजबूत करण्यासाठी हातभार लागेल.आपण बरेचजण यापूर्वीही या पतपेढीचे सभासद होता तसेच सेवानिवृत्तीनंतरही या पतपेढीचे ‘ब’ वर्ग सभासदत्व स्विकारून पतपेढीप्रती असलेला विश्वास अधिक दृढ कराल अशी आशा व्यक्त करतो असे पतपेढीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
ठेवींचे व्याजदर खालीलप्रमाणे आहेत.
सेव्हींग (साधी) ठेव व्याजदर – ६%
👉 संचित ठेव
१२ महिने व्याजदर – ८%
२४ ते ६० महिने व्याजदर – ९%
👉 मासिक प्राप्ती ठेव व्याजदर – ९%
👉 मुदत ठेव
९१ ते १८० दिवस व्याजदर – ६%
१८१ ते १ वर्ष व्याजदर -६.५०%
१ वर्ष ते २ वर्षे व्याजदर – ७%

विशेष योजना
👉कै.द.सि.सामंत गुरुजी मुदत ठेव योजना व्याजदर -८%

तरी ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक बंधू-भगिनींना पुनश्च आवाहन करतो की,आपण शिक्षक पतपेढीच्या नजीकच्या तालुका शाखा कार्यालयाशी संपर्क साधून मोठ्या प्रमाणात ठेवींची गुंतवणुक करुन स्वतःचा फायदा करुन घ्यावा असे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्या. सिंधुदुर्गनगरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

अभिप्राय द्या..