वेंगुर्ला /-

वेंगुर्ले येथे वेंगुर्ले तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने ‘आशा दिवस ‘ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स.सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते झाले.यावेळी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ,रेडी सरपंच रामसिंग राणे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर, प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पाटील व सर्व तालुका ऑफिस चे आरोग्य कर्मचारी व अधिकारी व तालुका समूह संघटक व गटप्रवर्तक व तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.या कार्यक्रमात सभापती अनुश्री कांबळी यांनी आशा स्वयंसेविका यांच्या कामाविषयी बोलताना आशा स्वयंसेविका या खुप पुण्याचे काम करत आहेत, असे गौरवोद्गार काढले. जि.प. सदस्य प्रितेश राऊळ  यांनी आशा यांनी कोरोना काळात घरोघरी जाऊन  बाहेरून आलेल्या प्रवासी  लोकांना प्रथम भेटून माहिती  घेऊन खूप मोलाचे कार्य केले आहे, अशा या सेवाभावी  आशांचे मानधन खूप कमी असल्याने त्यांना शासन स्तरावरुन काही मोबदला मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन, असे सांगितले.यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व आशा स्वयंसेविकाना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन परूळे प्रा.आ.केंद्राचे माजी कनिष्ठ सहाय्यक चंद्रकांत  म्हापणकर यानी केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page