कुडाळ /-
सिंधुदुर्गा मध्ये झालेल्या वादळात वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावातील बाधितांना संस्थांतर्फे आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. वैभववाडी तहसीलदार कार्यालय येथील तहसीलदार श्री रामदास झळके व संस्था अध्यक्ष श्री दयानंद चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी तहसीलदार झळके यांनी तालुक्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत या संस्थेतर्फे 2020– 21 सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रविवारी दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी करूळ घाटात झालेल्या भीषण अपघातात जखमी विनामूल्य सेवा देत पडवे हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाणारे व सतत सोबत राहणारे श्री हेमंत रावराणे यांचाही तहसीलदार यांच्या तर्फे शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणारे ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते श्री. पाटील सामाजिक कार्यकर्ते श्री राजू भालेकर नायब तहसीलदार श्री. अशोक नाईक श्री अमित निंबाळकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तहसिलदार श्री .झळके यानीही संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले संस्थेमार्फत आर्थिक गरजू, शैक्षणिक विद्यार्थ्यांना जी मदत दिली जाते ते त्यांच्या जीवनासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले .हे असेच कार्य सुरू राहून त्यांचे आशीर्वाद संस्थेसाठी मिळतील हेही नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन ट्रस्टचे सचिव श्री संदीप साळळकर यांनी केले.
