आचरा /-
वड पिंपळाच्या व्रूक्षांचे होणारे उच्चाटन पर्यावरणाच्या द्रूष्टीने धोकादायक ठरत असून या व्रूक्षांचे संवर्धन काळाची गरज बनले आहे या साठी चिंदर ग्रामपंचायतीच्या
वतीने अभिनव उपक्रम राबवित वड आणि पिंपळाच्या व्रूक्षांची लागवड केली जात आहे. याचा शुभारंभ वटपौर्णिमेच्या दिवशी केला गेला. वसुंधरा दिन ते कृषिदिन या कालावधीमध्ये वृक्षलागवड करण्यात येणार आहे. गावामध्ये पर्यावरण द्रूष्ट्या महत्त्व असणारी वड व पिंपळ वृक्षाची ५५ झाडे प्रति ग्रा.पं सभासद पाच याप्रमाणे लावून जगवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाड लावू या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ सरपंच सौ राजेश्री कोदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसरपंच दीपक सुर्वे ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, तलाठी योगेश माळी, पोलिसपाटील दिनेश पाताडे, ग्रां.पं. सदस्य केदार परुळेकर, ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगावकर, रणजित दत्तदास, भास्कर पवार, ग्रामस्थ दिलीप कुमार मेस्त्री, अरुण परुळेकर, विनोद केळुसकर उपस्थित होते.
