कणकवली /-
आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उन्हा-पावसाची तमा न बाळगता काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून रेनकोटचे वाटप करण्यात आले.तौक्ते वादळात कणकवली शहरातील वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी शहरात कार्यरत असलेल्या १३ वीज कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली होती. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेला सलाम म्हणून विजतंत्री कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष दालनात समीर नलावडे यांच्या हस्ते रेनकोट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक विराज भोसले, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, बाबू गायकवाड, नगरसेविका राणे, व वीज महावितरण सह्यायक अभियंता कांबळे, एस. जी. पवार, के. जी. तांबे आर. जी. सातवसे, एस. एम. आचरेकर,वाय. पी. राऊत उपस्थित होते.
