कुडाळ /-
तौक्ते वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडून फार मोठे नुकसान झाले. बागेचे नुकसान झाले, रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. ट्री कटिंग मशीन अभावी हि पडलेली झाडे हटविण्यास विलंब झाला होता. तरी येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वादळ तसेच पूर व इतर नैसर्गिक आपत्ती उदभवल्यास झाडे कटिंग करण्यासाठी तातडीची मदत व्हावी याकरिता आमदार वैभव नाईक यांनी कोंकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग या संस्थेस ट्री कटिंग मशीन भेट दिली आहे.याप्रसंगी संतोष शिरसाट, बबन बोभाटे, सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, राजू गवंडे, संदेश प्रभू, सुभाष परब, संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे, सचिव वैभव अमृस्कर, महेश राऊळ तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते