“जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम” मूळे संशयित ताब्यात,डंपर संघटनेच्या जागरूकीमुळे संशयित आंबोली येथुन कुडाळ पोलिसांच्या ताब्यात..
कुडाळ /-
कुडाळ शहरातील मुंबई-गोवा हायवे नजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंप समोर उभा करून ठेवण्यात आलेला डंपर MH.07-6662 हा टाटा कंपनीचा डंपर चोरून कोल्हापूरच्या दिशेने पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांचा प्रयत्न “जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम” मूळे फसला.आपला डंपर चोरी झाल्याची माहिती मिळताच आंबोली येथे तेथील डंपर व्यावसायिकांच्या मदतीने त्या संशयिताला डंपरसह पकडण्यात आले.ही घटना आज बुधवारी ५ मे ,रोजी,सकाळी ०६ वाजन्याच्या सुमारास घडली आहे.गेल्या वर्षी देखील लोकडाऊ कालावधीत पिंगुळी हायवे येथून डंपर चोरीला गेला होता,मात्र तो काही दिवसांनी गोवा येथे सापडला होता.संबंधित डंपर व संशयित कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, कुडाळातील रिलायन्स पेट्रोल पंप येथे हा डंपर ठेवला होता. त्याला डुप्लिकेट चावी लावुन नेण्यात आले. दरम्यान डंपरला ट्रॅकींग सिस्टीम मुळे असल्याने मालकाला डंपर आंबोलीच्या दिशेने जात असल्याचे मोबाईल वर दिसले. त्याने तात्काळ लोकमान्य डंपर संघटनेचे उपाध्यक्ष उल्हास उर्फ पिट्या नार्वेकर यांनी आंबोली येथील डंपर व्यावसायिकांना त्याची कल्पना दिली व नार्वेकर, साई अणावकर, वैभव देसाई यांनी आंबोलीच्या दिशेने डंपरची पाठलाग केली व आंबोलीतील व्यवसायिक पोलिस यांच्या मदतीने आंबोलीत आरोपीसह डंपर पकडण्यात आला. नार्वेकर आणि सहकाऱ्यांनी डंपर ची खात्री केली. त्यानंतर डंपर व संशयिताला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अधिक तपास कुडाळ पोलीस करत आहेत.