खड्यात रास्ते की रस्त्यात खड्डे ह्या प्रश्ना समोर अध्याप देखील प्रश्नचिनच ?

दोडामार्ग /-

संपूर्ण जगभरात थैमान मांडून बसलेला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दोडामार्ग तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे, त्यातच काही शासकीय यंत्रणा देखील अपुरी पडत असून कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाची नेआण करण्यासाठी असलेल्या रुग्णवाहिकेला देखील रस्त्याच्या दुरवस्था मुळे तारे वरची कसरत करावी लागत आहे .
दोडामार्ग ते विजघर व बांदा ते दोडामार्ग हा दोडामार्ग तालुक्यातील मुख्य रस्ता मृत्यू चा सापळा बनलेला असून खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे ह्या पडलेल्या प्रश्ना समोर अद्याप देखील प्रश्नचिन्हच उदभवलेले दिसत आहे, गेले काही दिवस दोडामार्ग मधील रस्ता ही मुख्य समस्या असून अध्याप देखील ह्या समस्येचे निवारण होताना दिसत नसल्याने दोडामार्ग वासीयांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे,त्यातच रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने कित्येक युवक- युवतींना रोजगारासाठी गोवा राज्यावर अवलंबून राहावे लागत असून ये-जा करण्यासाठी असलेला हा मुख्य रस्ता मात्र मृत्यू चा सापळा बनल्याने दुचाकीस्वार युवक-युवतींना तारेवरची कसरत करावी लागते, त्यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता एखादया गावात कोरोना चा रुग्ण आढळल्यास तो रुग्ण अतिशय गंभीर स्वरूपात असल्यास रस्त्याची दुरवस्था पाहता रुग्णवाहिकेतून आरोग्य केंद्रा पर्यंत पोहचण्या अगोदर रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page