येत्या 24 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

येत्या 24 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

ब्युरो न्यूज /-

▪️ गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. दोन दिवसांपासून काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे.

▪️ शनिवारी संध्याकाळी मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये काही भागांत हलक्या तर काही परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे.

इशारा : राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे या भागांमध्ये येत्या 24 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

▪️ अंदाज : 14 आणि 15 सप्टेंबर रोजी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रत मध्यम ते हलक्या सरी बरसतील. तर 16 सप्टेंबर रोजी विदर्भ आणि कोकणातील अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

▪️ दिलासा : मुंबईत मागच्या आठवड्यात उष्णता वाढल्यामुळे उकाड्यानं नागरिक हैराण झाले होते. शुक्रवार आणि शनिवारी पाऊस पडल्यानं हवेत काहीसा गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

▪️ नुकसान : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या पावसानं जोर धरला आहे. राहाता तालुक्यातील केलवड येथे शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.

▪️पावसाची :नोंदया पावसानं मका आणि बाजरीची पिकं भुईसपाट झाली. केलवडमध्ये 25 मिनिटांत 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या 25 वर्षात पाहिल्यांदाच असा पाऊस झाला आहे.

अभिप्राय द्या..