कणकवलीत वादळीवार्‍यासह अवकाळी पावसाचा तडाखा..

कणकवलीत वादळीवार्‍यासह अवकाळी पावसाचा तडाखा..

कणकवली /-

कणकवली शहर तसेच तालुक्याच्या विविध गावांत आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. सायंकाळी सात वाजल्यापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे तालुकावासीयांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान सायंकाळी सात पासून सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक भागात वीज तारांवर झाडे कोसळली आहेत. त्यामुळे तालुक्यातील वीज पुरवठा देखील ठप्प झाला आहे.

अभिप्राय द्या..