कुडाळ सिटी सेंटर येथे फळ/ भाजी विक्रेते मालाची करताना आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल..

कुडाळ सिटी सेंटर येथे फळ/ भाजी विक्रेते मालाची करताना आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल..

कुडाळ /-

कुडाळ सिटी सेंटर येथे फळ व भाजी विक्रेते मालाची करत असताना मिळाल्याने या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी चौघांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात केला आहे. ही कारवाई आज बुधवारी ११.२० वा केली. कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे व पोलिस श्री राऊळ, एस. आर. फर्नाडिस व पोलिस रूपेश सारंग हे कुडाळ शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी जिल्हाधिकारी यांचा दु. ११ वा नंतर कोणत्याही वस्तूची विक्री करण्यास मनाई आदेश आहे हे माहित असुनही श्रीकृष्ण मनोहर कोरगावकर ३५ काळसेबागवाडी मालवण हे कांदा बटाटा विक्रि करत होते. सुरज सुधाकर वाड्येकर २७ कुडाळ पानबाजार हा आंबे विक्रि कासिम मिरसा भगवान ३० पिंगुळी गोंदयाळे कांदा बटाटा , तर मल्लिक रहेम कळस ३६ पानबाजार कुडाळ भाजीविक्री करताना आढळला. या चौघांनीही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भादवि कलम १८८ , २६९ ,२७० या प्रमाणे कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद रूपेश सारंग यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..