दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकणचे अध्यक्ष श्री.गणेश नाईक यांची माहिती..
कुडाळ /-
दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग च्या वतीने रांगणा गड पायथ्याच्या जंगलातील तोफांचे संवर्धन करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.याच मोहिमेअंतर्गत रांगणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या तिसऱ्या तोफेची शोध मोहीम यशस्वी करण्यात आली. असून लवकरच ही तोफ गडावर नेण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे असे दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग चे अध्यक्ष गणेश नाईक यांनी आज कुडाळ येथे मीडियाशी बोलताना सांगितले आहे.