जानवली सरपंच काका राणे, अमोल राणे यांचा भाजप कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार नितेश राणे यांना शिवसेनेचा मोठा धक्का..

जानवली सरपंच काका राणे, अमोल राणे यांचा भाजप कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार नितेश राणे यांना शिवसेनेचा मोठा धक्का..

कणकवली /-

आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

जानवली गावात शिवसेनेने भाजप पक्षाला जोरदार धक्का दिला आहे.भाजपचे जानवली गावचे सरपंच शिवराम उर्फ काका राणे, अमोल राणे यांच्यासह रजत राणे, राजेश परब, पांडुरंग मेस्त्री आदी कार्यकर्त्यांनी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी प्रवेश कर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून पक्षात स्वागत केले. “शिवसेना जिंदाबाद” “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो” अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, सचिन सावंत, अँड.हर्षद गावडे, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, भालचंद्र दळवी, रामू विखाळे, दामू सावंत, संदेश पटेल, राजु राठोड, विलास कोरगावकर, प्रसाद अंधारी, दादा भोगले, सत्यवान राणे, दीपक दळवी, संजय पारकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..