वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात आज शनिवारी आलेल्या अहवालात नव्याने १३ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.तालुक्यातील सक्रिय पॉझिटिव्ह संख्या १५२ इतकी झाली आहे.
आज आलेल्या अहवालात कामळेविर १,खानोली ३ मठ सिद्धार्थवाडी २,वजराट २,मठ वडखोल १,रामघाट रोड ३,रेडी १ इत्यादी एकूण १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.कोव्हिड १९ परिस्थिती उद्भवल्यापासून तालुक्यात आतापर्यंत ७५२ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या असून ” ५८६ व्यक्ती ” बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत.सध्या तालुक्यातील सक्रिय पॉझिटिव्ह संख्या १५२ इतकी असून वेंगुर्ला कोव्हिड केअर सेंटर मध्ये ३१,गृहविलगीकरणामध्ये ७८,शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे १२,प्रायव्हेट २ व सिव्हिल हॉस्पिटल ओरोस येथे १६ व्यक्ती उपचार घेत आहेत.दरम्यान गुरुवारी २७ व शुक्रवारी ४ अशा व्यक्तींचा कोव्हिड १९ (कोरोना) अहवाल पॉझिटिव्ह आला होता.यामध्ये गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालात आडेली फौजदारवाडी १,पलतडवाडी १,अणसुर २ व वेंगुर्ले शहर एरियात २ तसेच सायंकाळी उशिरा आलेल्या अहवालात वेंगुर्ले शहर एरियात ७ व्यक्ती, आसोली १,मठ सिद्धार्थनगर ३,भंडारगाव २,वजराट देवसू ३,खानोली २,कामळेविर १,केळुस,१,शेळपी १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत. शुक्रवारी दुपारी आलेल्या अहवालांमध्ये वेंगुर्ले शहरातील ४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आल्या होत्या.