कुडाळ /-
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांचा लाॅकडाऊन महाराष्ट्रसरकारने जाहीर करण्यात आला आहे.मिशन बिगिन अगेन नंतर ब्रेक दि चैनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पंधरा दिवसाच्या लाॅकडाऊनला कुडाळमद्धे चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापणा बंद ठेवण्यात आले आहेत. नागरीकांची वर्दळ देखील कमी झालेली पाहायला मिळत आहे.
माञ गेल्या लाॅकडाऊन प्रमाणे यावेळी पोलीसांचा बंदोबस्तात कपात करण्यात आला आहे.लाॅकडाऊन मुळे एसटी प्रशासनावर परिणाम झालेला दिसून आला एसटीच्या काही फेऱ्या सुरू तर काही फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. कारण प्रवाशिच नसल्याने एसटीच्या प्रशासनावर देखील परिणाम झालेला आहे. एकंदरीत लाॅकडाऊनच्या पहील्याच दिवशी नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.