मसुरे /-
जिल्ह्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत श्री देवी भराडी मंदिर दर्शनासाठी बंद राहील याची कृपया भाविकांनी नोंद घ्यावी. तसेच करोना संदर्भातील सर्व नियम पाळून करोना हद्दपार करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांनी केले आहे.