पोईप भाजपच्या वतीने मान्यवरांचे सत्कार!

पोईप भाजपच्या वतीने मान्यवरांचे सत्कार!

मसुरे /-

भाजप व पोईप ग्रामस्थ यांच्या वतीने जि प चे वित्त व बांधकाम सभापती महेद्र चव्हाण, राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त कृष्णाजी दळवी, जिल्हा स्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कर प्राप्त मंगेश नाईक, सिंधू रत्न पुरस्कार प्राप्त ओंकार येरम यांचा सत्कार सोहळा पोईप हायस्कुल येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, परशुराम नाईक, पोईप संस्थेचे चेअरमन बाळा पालव, श्रीधर नाईक, सावळाराम नाईक, पोईप
ग्रापचे उपसरपंच संदिप सावंत, मसदे चुनवरे ग्रा प सदस्य रामदास पांजरी, नंदु माधव, हेंमत पालव, महेश पालव, विश्वनाथ पालव, सुर्यकांत चव्हाण, मंगेश नाईक, जयवंत परब, आपु आंबेरकर, विलास पांजरी, बाळा नाईक, ग्रामसेवक ए बी गर्कळ, स्वप्नील पोईपकर, उमेश तावडे, बाळा पोईपकर, आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी बोलताना महेंद्र चव्हाण म्हणाले, माझा सत्कार पोईप गावच्या तीन रत्नांबरोबर होत आहे हा माझा सन्मान आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. माझ्या सत्काराची परत फेड मी विकास कामातुन नक्कीच करने अशी ग्वाही दिली.
ग्रामसेवक कृष्णाजी दळवी म्हणाले, याच पोईप गावात ग्रामपंचायत मध्ये लिपीक म्हणुन कामास सुरूवात केली व लिपीक म्हणुन काम करत असताना ग्रामपंचायत कामकाजाची व प्रशासनाची चांगल्या प्रकारे माहिती मिळाल्याने आपण ग्रामसेवक पदापर्यत पोचलो. आपल्या गावच्या वतीने झालेला सत्कार अविस्मरणीय आहे. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आभार मानले.

अभिप्राय द्या..